सद् गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर जयंती...
ll श्रीराम समर्थ ll सर्व साधनाचे मूळ l रामनामाची केवळ ll तत्त्वज्ञान योगध्यान l रामनामी जाहले लीन ll सर्व साधन आटाआटी l रामनाम ठेवा कंठी ll दास म्हणे नाम अंत: करणी l तोची जाणा आत्मज्ञानी ll "अखंड नामात राहणे म्हणजेच मोक्ष" असे अत्यंत विश्वासाने ज्यांनी सांगितले, ते सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हे भारतीय अध्यात्म जीवनातील थोर नाम प्रसारक होते. आज माघ शुद्ध द्वादशी म्हणजे त्यांची जयंती होय. या प्रयोजनाने हे चिंतन. गेल्या पाच-सहा हजार वर्षांच्या जगाच्या इतिहासामध्ये जगात अनेक संस्कृती निर्माण झाल्या. त्यापैकी आजतागायत भारतीय संस्कृतीच फक्त आपले अस्तित्व टिकवून आहे, याचे कारण काय असेल तर भारतीय "अध्यात्मविद्या" होय. आज वैज्ञानिक शोधांच्या माध्यमातून भौतिक सुख - सुविधा सर्वत्र सहजपणे उपलब्ध असूनही, मानसिक समाधानाची मात्र उणीव भासत राहते आहे, कारण या सुख सुविधा उपभोगण्याचे शरीर सामर्थ्य संपल्यानंतर पुढील मार्ग काय ? जीवनाचा खरा अर्थ काय ? असे अनेक विविध प्रश्न निर्माण होतात, आणि मग भगवंताची आठवण येते. त्...